Headlines

वेंगुर्ला तालुक्यात शिवसेना वाढीसाठी सतत प्रयत्नशील : सचिन वालावलकर…

⚡वेंगुर्ला ता.१९-: बाळासाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे व 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण यामुळे शिवसेना पक्ष आज मजबूत होत चालला आहे. माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आपला शिवसेना पक्ष वरच्या क्रमांकावर गेला आहे. एकनाथ शिंदे यांचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच वेंगुर्ला तालुक्यात गावागावात शिवसेना पक्ष वाढीसाठी कार्यरत राहून जनसेवेत रहा, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी आज शुक्रवारी दुपारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय वेंगुर्ला येथे शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमावेळी बोलताना केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. वेंगुर्ला शहरात शिवसेना आपले कार्य तळागाळापर्यंत जोपासत असून तालुकाप्रमुख वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, शहर पदाधिकारी अजित राऊळ व अन्य पदाधिकारी हे पक्ष वाढीसाठी जोमाने कार्य करीत आहेत.जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती वरही आपण यश मिळविले आहे. आमदार यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून वेंगुर्ला शहरासाठी निधी आणावयाचा आहे. आपले तालुक्यातील नगरसेवक संख्याबळ दोन इतके झाले आहे, असे सचिन वालावलकर यांनी बोलताना सांगितले. यावेळी तालुका संघटक बाळा दळवी यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका संघटक बाळा दळवी यांच्यासह पंचायत समिती सदस्या साक्षी नार्वेकर, ज्योत्स्ना केळुसकर,उभादांडा माजी उपसरपंच गणपत केळूसकर, प्रकाश मोटे, शहर पदाधिकारी अजित राऊळ, पंकज शिरसाट, सत्यवान साटेलकर, संजय परब, आडेली – वेतोरे संघटक मितेश परब, मातोंड ग्रामपंचायत सदस्य दिपेश परब, जयवंत मालणकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page