“वाचणारी कणकवली आम्ही वाचवू”, “एकच आप्पा बाकी साऱ्या गप्पा”

कणकवली नगर वाचनालय बचाव रॅली धडकली; जोरदार घोषणाबाजी

कणकवली ता.०३-:* कणकवली नगर वाचनालय बचाव या टॅगलाईन खाली शिवसेनेच्या वतीने कणकवली पटवर्धन चौक ते नगर वाचनालय अशी जनजागृती रॅली काढत याबाबत जनजागृती करण्यात आली. आमदार नितेश राणे अध्यक्ष असलेल्या या नगरवाचनालयात ३५ हजार पुस्तके धूळखात पडत असल्याचा आरोप करण्यात आला. वाचन संस्कृती टिकावी व आप्पासाहेब पटवर्धन यांचा वारसा असलेली नगर वाचनालय पुन्हा जनतेच्या, वाचन प्रेमींच्या सेवेत यावे याकरिता वाचनालय बचाव मोर्चा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यावेळी “राडा संस्कृती थांबवा वाचन संस्कृती वाढवा, कोकण गांधी एकच आप्पा बाकी सार्‍या गप्पा, चाकू सोडा, लेखणी धरा, राडा संस्कृती सोडा वाचन संस्कृती वाढवा अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कोकण पर्यटन समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना नेते,जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख नगरसेवक सुशांत नाईक, नगरवाचनालय बचाव समितीचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक कन्हया पारकर, रुपेश नार्वेकर, सुमेधा अंधारी, माजी नगरसेवक भूषण परूळेकर, युवासेना उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर, संतोष परब, बंडू ठाकूर, युवासेना माजी जिल्हाप्रमुख हर्षद गावडे, सरपंच सुदाम तेली, सरपंच रुपेश आमडोसकर, समिर परब, शहर प्रमुख शेखर राणे, राजू राठोड, सुनील पारकर, संजय पारकर, महेश कोदे, वैभव मालडकर, अजित कानेकर, रामदास वीखाळे, आदित्य सापळे, अनुप वारंग, सोहम वाळके, दिव्या साळगावकर, सिद्धेश राणे आदी उपस्थित होते. “वाचणारी कणकवली आम्ही वाचवू” नगर वाचनालयाची दुरावस्था पुस्तकांची हेळसांड या टॅगलाईन व सिंधुदुर्गाची सांस्कृतिक राजधानी कणकवलीचे नगर वाचनालय वाचवा अशा पद्धतीच्या मथळ्याखाली कणकवली पटवर्धन चौकात लावलेला बॅनर देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यावेळी शिवसेनेच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार आरोप करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या वतीने २१ हजार रुपयांची मदत नगर वाचनालयाला देण्यात आली.

You cannot copy content of this page