मालवण ता.०३-:* मालवण भाजपा कार्यालयात भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृती दिन संपन्न झाला. तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते स्व. मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, पूजा करलकर, पूजा सरकारे, माजी जि. प. सदस्य संतोष साटविलकर, भाऊ सामंत, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, महिला शहराध्यक्ष सौ. अन्वेषा आचरेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, आबा हडकर, सुधीर साळसकर, दादा नाईक, निलेश खोत, प्रमोद करलकर, श्री. भोजने आदी उपस्थित होते.
