वेर्ले सैनिक भवन येथे आजी माजी सैनिकांकडून लडाख येथील शहिदांना वाहण्यात आली श्रद्धांजली

सावंतवाडी ता.०३-:देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर जाताना लदाख येथील अती दुर्गम भागात बसला अपघात होऊन देशाचे जवान शहीद झाले. या वीर जवानांना वेर्ले येथील सैनिक भवन येथे आजी माजी सैनिकांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्याच्या परिवारास या दुःखातून सावरण्याची ईश्वराने शक्ती द्यावी अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी आजी माजी सैनिक, वेर्ले गावचे सरपंच सुभाष राऊळ उपस्थित होते.

You cannot copy content of this page