आक्षेप ८ जूनपर्यंत नोंदवाविण्याचे आवाहन
कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्यात ९ जिल्हा परिषद तर १८ पंचायत समिती मतदारसंघ नवीन प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.त्यामुळे निवडणूक हालचालीना वेग आला आहे.या प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.त्यावर हरकती ८ जून पर्यत नोंदवण्याचा कालावधी आहे. कणकवली तालुक्यात पूर्वीच्या आठ जिल्हा परिषद मतदार संघांमध्ये बद्दल होवून नववा नांदगाव जिल्हा परिषद मतदारसंघ व नांदगाव,ओटव हे दोन पंचायत समिती गट नव्याने प्रभाग रचनेत अस्तित्वात येणार आहेत. त्यामध्ये तालुक्यातील ९ जिल्हा परिषद मतदार संघ व १८ पंचायत समिती खालील प्रमाणे नावे येणार आहेत.
जिल्हा परिषद मतदारसंघ-खारेपाटण त्यात पंचायत समिती १)खारेपाटण- खारेपाटण,वायगणी, चिंचवली नडगिवे.पंचायत समिती २) वारगाव-वारगाव, कुरंगवणे, शेर्पे,शिडवणे,साळीस्ते जिल्हा परिषद -कासार्डे त्यात पंचायत समिती १)तळेरे- तळेरे दारुम, आयनल, कोळोशी. पंचायत समिती २)कासार्डे-पूर्ण गाव.. जिल्हा परिषद -नांदगांव त्यात पंचायत समिती-१)नांदगाव-नांदगाव,असलसे,तोंडवली.पंचायत समिती २) ओटव- ओटव, माईन, भरणी, सावडाव,बेळणे खुर्द,तिवरे, डामरे. जिल्हा परिषद -फोंडा त्यात पंचायत समिती-१)लोरे-लोरे,वाघेरी, फोंडा उत्तर बाजारपेठ,घोणसरी.पंचायत समिती २) फोंडा- फोंडा दक्षिण बाजारपेठ. जिल्हा परिषद -हरकुळ बु. त्यात पंचायत समिती-१)हरकुळ खुर्द- हरकुळ खुर्द, करूळ,कोंडये, भिरवंडे, गांधीनगर,कुंभवडे. पंचायत समिती २) हरकुळ बुद्रुक-हरकुळ बुद्रुक, नागवे,करंजे. जिल्हा परिषद-नाटळ त्यात पंचायत समिती-१)नाटळ-नाटळ, दिगवळे,नरडवे.पंचायत समिती२)सांगवे-सांगवे,शिवडाव, दारिस्ते. जिल्हा परिषद-जाणवली त्यात पंचायत समिती-१)जाणवली-जाणवली, हुमरठ, साकेडी, तरंदळे.पंचायत समिती २)वरवडे-वरवडे,पिसेकामते, बिडवाडी. जिल्हापरिषद -कलमठ त्यात पंचायत समिती१)कलमठ(पूर्ण गाव) पंचायत समिती २)वागदे-वागदे, आशिये,सातरल,कासरल. जिल्हापरिषद -कळसुली त्यात पंचायत समिती१)कळसुली-कळसुली,शिरवल,हलवल. पंचायत समिती २)ओसरगाव-ओसरगाव, बोर्डवे, कसवण.
