शिवसेना व युवासेना मार्फत दिगवळे सुतारवाडी येथे भात बियाणे वाटप

*⚡कणकवली ता.०३-:* शिवसेना व युवासेना मार्फत कणकवली तालुक्यातील दिगवळे सुतारवाडी येथे भात बियाणेचे वाटप माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी शेतकऱ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.

यावेळी नाटळ विभागप्रमुख आनंद आचरेकर, युवा सेना कणकवली उपतालुकाप्रमुख उत्तम लोके, युवा सेना प्रमुख संतोष सावंत, शाखाप्रमुख शामसुंदर जाधव,रुपेश गावकर, संजय आचरेकर, माजी सरपंच दीपक मेस्त्री, माजी ग्रा. पं. सदस्य बबन मेस्त्री, धोंडी गावडे, संतोष वाळवे, दीपक मठकर व दिगवळे सुतारवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page