Headlines

वेंगुर्ल्यात नवनिर्वाचित पलिस आयुक्तांचे अनोखे स्वागत

वेंगुर्ला ता.०५-:* वेंगुर्ला पोलिस स्टेशनमध्ये अतुल जाधव यांची वेंगुर्ला पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्हा युथ संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्रीनिवास गावडे यांनी त्यांची भेट घेऊन झाडाचे रोप देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत केले. सध्या बेसुमार वृक्षतोड होत आहे. त्यामुळे निसर्गाचे वेळापत्रक कोलडमले आहे. निसर्ग स्थिर रहाण्यासाठी पोलिस निरीक्षक श्री. जाधव यांना झाडाचे रोप देताना श्रीनिवास गावडे यांनी ख-या…

Read More

रेखाकला परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूलचे यश

वेंगुर्ला ता.०५-:* शासकीय रेखाकला परीक्षा २०२२च्या परीक्षेत उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेला बसलेले १९ही व इंटरमिडिएट ग्रेड परीक्षेला बसलेले २५ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी मयुरी सुभाष मणचेकर हिने इंटरमिडीएट परीक्षेत ‘ए‘ ग्रेड तर एकूण १५ विद्यार्थ्यांनी ‘बी‘ ग्रेड प्राप्त केली….

Read More

इंजिनियरिंग अभ्यासक्रमासाठी यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू …

सावंतवाडी ता.०५-:* पॉलिटेक्निक अर्थात डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची शैक्षणिक वर्ष 2022-23 वर्षाची प्रवेश प्रक्रिया यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिकृत प्रवेश प्रक्रिया केंद्र भोसले पॉलिटेक्निकमध्ये सुरू करण्यात आले आहे. दहावीच्या निकालापूर्वीच परीक्षेच्या आसन क्रमांकाच्या आधारे विद्यार्थी आपली प्रवेश नोंदणी करू शकतात. ही प्रक्रिया 30 जून पर्यंत चालणार असून इच्छुक…

Read More

“माझी वसुंधरा अभियानात” सावंतवाडी नगरपरिषद कोकण विभागात अव्व्ल

आरोग्य विषयक स्पर्धेमध्ये हीच भूमिका ठेवल्यास आपल्या शहराचं नाव राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होईल : माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांचा विश्वास सावंतवाडी ता.०५-:* माझी वसुंधरा अभियानात सावंतवाडी नगरपरिषदेणे कोकण विभागात मिळालेला अव्व्ल क्रमांक ही बाब शहर वासियांसाठी अभिमास्पद आहे. भविष्यात होणाऱ्या इतर आरोग्य विषयक स्पर्धेमध्ये हीच भूमिका अधिक जोमात वृद्धिंगत ठेवल्यास आपल्या शहराचं नाव…

Read More

कणकवली न.पं.कडून अनधिकृत बॅनर बाजीवर आता कडक कारवाई

कणकवली ता.०५-:* कणकवली:शहरात अनधिकृतपणे लागणारे बॅनर व यामुळे शहरात निर्माण होणारे तणावपूर्ण वातावरण तसेच शहराचे होणारे विद्रुपीकरण यामुळे कणकवली नगरपंचायत ने अनधिकृत बॅनर वर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. कणकवली शहरात नेत्‍यांचे वाढदिवस, राजकीय मेळावे तसेच इतर कार्यक्रमांसाठी ठिकठिकाणी विनापरवाना बॅनर लावले जातात. सध्या एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठी बॅनरबाजी हाेत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने कडक पावले…

Read More

दुचाकी आणि ओमनीची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात…

दोन्ही गाडींचे चालक जख्मी; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल.. सावंतवाडी ता.०४-:* कोलगाव येथे ओमनी आणि ड्यूक 200 दुचाकीमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जख्मी झाला असून, ओमनी चालक देखील जख्मी झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दुचाकीने समोरून येऊन ओमनी ला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. अशी माहिती तेथील…

Read More

शेठ न. म. विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापक पदी संजय सानप रुजू…

* देवगड – खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकपदी श्री. संजय जगन्नाथ सानप हे १ जून २०२२पासून विराजमान झाले. संजय सानप (एम. ए. बी. एड. डीप. व्ही. जी.) हे १९९९ साली खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. २०१०साली वोकेशनल गाईडन्स डिप्लोमा पूर्ण करून त्यांनी…

Read More

गटार, व्हाळी सफाईचे काम दिखाऊपणाचे; मुख्याधिकाऱ्यांनी कॅटवॉक करत पाहणी करावी-:राजन वराडकर

मालवण ता.०४-:* मालवण नगरपालिकेतर्फे शहरात सुरू असलेल्या गटार व व्हाळी साफसफाईच्या कामाची माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी पाहणी केली पावसाच्या तोंडावर होत असलेले गटार व व्हाळी सफाई ही दिखाऊ पद्धतीची व अर्धवट स्थितीतील असून गटार व व्हाळीमध्ये चिखल व कचऱ्याचे साम्राज्य जैसे थे असल्याचा आरोप वराडकर – कुशे द्वयी यांनी…

Read More

दोन दिवशीय बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी– सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ मुंबई अंतर्गत (कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग व गोवा विभाग) आयोजित दोन दिवशीय बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर आनंदवाडी वेंगुर्ला येथे २८ व २९ मे रोजी ज्येष्ठ बौध्दाचार्य नारायण आरोंदेकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले. या शिबीरात १० बौध्दाचार्य प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे यात ३ महिला भगिनींचा समावेश…

Read More

आरवली ग्रामसेवक विनय धाकोरकर यांचा उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार

वेंगुर्ला ता.०४-:* आरवली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विनय धाकोरकर यांच्या ४ वर्षांच्या सेवेनंतर त्यांची बदली झाल्याने ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांतर्फे त्यांच्या आरवली गावातील चांगल्या सेवेबद्दल त्यांचा गावचे सरपंच तातोबा कुडव व आरवली ग्रामस्थांतर्फे आरवली तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मयूर आरोलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आरवली ग्रामपंचायतीचे…

Read More
You cannot copy content of this page