दोन्ही गाडींचे चालक जख्मी; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल..
सावंतवाडी ता.०४-:* कोलगाव येथे ओमनी आणि ड्यूक 200 दुचाकीमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जख्मी झाला असून, ओमनी चालक देखील जख्मी झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दुचाकीने समोरून येऊन ओमनी ला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. अशी माहिती तेथील स्थानिकांनी दिली.
यावेळी तेथील स्थानिक ग्रामस्थांनी दोन्ही जखमींना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

