शेठ न. म. विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापक पदी संजय सानप रुजू…

* देवगड – खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकपदी श्री. संजय जगन्नाथ सानप हे १ जून २०२२पासून विराजमान झाले. संजय सानप (एम. ए. बी. एड. डीप. व्ही. जी.) हे १९९९ साली खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. २०१०साली वोकेशनल गाईडन्स डिप्लोमा पूर्ण करून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समुपदेशनाचे कार्य सुरू केले.

सन २०२० सालापासून ते प्रशालेमध्ये पर्यवेक्षक पदी नियुक्त झाले. 1 जून 2022 रोजी शेठ न.म.विद्यालय, जुनियर कॉलेज ऑफ सायन्स, काॅमर्स अँड आर्ट्स व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेच्या मुख्याध्यापक पदावर ते विराजमान झाले.

त्यांच्या या निवडीबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भिकाजी कर्ले, सचिव महेश कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे, सहसचिव आत्माराम कांबळे, मोहन कावळे, तसेच इतर सर्व संस्थेचे पदाधिकारी संचालक, तसेच सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संजय सानप सरांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page