दोन दिवशीय बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी– सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ मुंबई अंतर्गत (कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग व गोवा विभाग) आयोजित दोन दिवशीय बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर आनंदवाडी वेंगुर्ला येथे २८ व २९ मे रोजी ज्येष्ठ बौध्दाचार्य नारायण आरोंदेकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले. या शिबीरात १० बौध्दाचार्य प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे यात ३ महिला भगिनींचा समावेश होता.

या दोन दिवशीय शिबीरात बौध्दाचार्यांचे नियम, विविध प्रकारच्या विधी कशा व कधी घ्यायच्या, तसेच विधीचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. बौद्ध पूजा पाठासंदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली. या शिबिराच्या सांगतेवेळी सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ मुंबई वेंगुर्ला शाखेचे अध्यक्ष प्रेमानंद जाधव, भिवा जाधव, वामन कांबळे, वाय.जी.कदम, सखाराम जाधव, सुभाष जाधव, जयंत जाधव, प्रेमानंद जाधव, गजानन जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी या बौध्दाचार्य प्रशिक्षण शिबिरामध्ये महेंद्र सावंत, जयंत जाधव, अमित जाधव, टिळाजी जाधव, गौतम जाधव, विठ्ठल जाधव, अमोल जाधव, अवनी जाधव, मोनाली जाधव, गीतांजली जाधव यांनी प्रशिक्षण घेतले.

You cannot copy content of this page