आरवली ग्रामसेवक विनय धाकोरकर यांचा उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार

वेंगुर्ला ता.०४-:* आरवली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विनय धाकोरकर यांच्या ४ वर्षांच्या सेवेनंतर त्यांची बदली झाल्याने ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांतर्फे त्यांच्या आरवली गावातील चांगल्या सेवेबद्दल त्यांचा गावचे सरपंच तातोबा कुडव व आरवली ग्रामस्थांतर्फे आरवली तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मयूर आरोलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आरवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच रिमा मेस्त्री, सदस्य किरण पालयेकर, समीर कांबळी, वैशाली रेडकर, जाधव, प्रवीण मेस्त्री, माजी सरपंच विलास चिपकर, सायली आरोलकर, ज्योत्स्ना राणे, माजी सदस्य शितल मेस्त्री, आरोग्य सेविका सुष्मिता साळगावकर, पोलीस पाटील मधुसुदन मेस्त्री-सुतार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page