वेंगुर्ल्यात नवनिर्वाचित पलिस आयुक्तांचे अनोखे स्वागत

वेंगुर्ला ता.०५-:* वेंगुर्ला पोलिस स्टेशनमध्ये अतुल जाधव यांची वेंगुर्ला पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्हा युथ संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्रीनिवास गावडे यांनी त्यांची भेट घेऊन झाडाचे रोप देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत केले.

सध्या बेसुमार वृक्षतोड होत आहे. त्यामुळे निसर्गाचे वेळापत्रक कोलडमले आहे. निसर्ग स्थिर रहाण्यासाठी पोलिस निरीक्षक श्री. जाधव यांना झाडाचे रोप देताना श्रीनिवास गावडे यांनी ख-या अर्थाने वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला आहे. यावेळी लोकराज्य मंच सचिव राजेश परब व मयुर आरोलकर उपस्थित होते. त्यांनी केलेल्या या अनोख्या स्वागताची वेंगुर्ला शहरात चर्चा दिसून आली.

You cannot copy content of this page