मातोंड हायस्कूलच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन

वेंगुर्ला ता.०५-:* मातोंड येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या सर्वोत्कर्ष एकता फाऊंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या हायस्कुलच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. यावेळी फाऊंडेशन तर्फे हायस्कूलचे माजी शिक्षक, संस्था प्रतिनिधी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

मातोंड ग्रामस्थ सत्कार्योत्तेजक संस्था मुंबई अंतर्गत व रयत शिक्षण संस्था सातारा संचलित न्यू इंग्लिश स्कुल मातोंड हायस्कूलच्या सुसज्ज अशा नविन प्रवेशद्वाराचे उद्घाटन मातोंडचे माजी सरपंच उदय परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर मातोंड ग्रामस्थ सत्कार्योत्तेजक संस्थेचे सदस्य दादा परब – म्हालटकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

यावेळी निवृत्त केंद्रप्रमुख रावजी परब, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम परब, पंचायत समिती माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब, निवृत्त मुख्याध्यापक एम.जि. मातोंडकर, उपसरपंच सुश्मिता परब, मुख्याध्यापक मांजलकर, मातोंड ग्रामस्थ सत्कार्योत्तेजक संस्थेचे सदस्य कृष्णा परब व सुभाष परब, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव कोंडये, महानंदा घाडी, सुवर्णलता जबडे, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे, सकल मराठा समाजाचे वसई तालुकाध्यक्ष विश्वास सावंत, निवृत्त वायरमन कृष्णा घाडी यांच्यासह माजी शिक्षक, सर्वोत्कर्ष एकता फाऊंडेशनचे सर्व सदस्य, माजी विद्यार्थी, हायस्कूलचे शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्य संख्येने उपस्थित होते.

यावेळी आयोजित सन्मान सोहळ्यात हायस्कूलचे माजी शिक्षक एन. ए. पाटील, व्ही. बी. पाटील, श्री.पवार, श्री.जाधव, श्री.वनसाळे, श्री.मांजरेकर, रावजी परब, मातोंड ग्रामस्थ सत्कार्योत्तेजक संस्थेचे सदस्य दादा म्हालटकर, कृष्णा परब व सुभाष परब, रक्तमित्र प्रतिष्ठानचे बाबली गवंडे, विश्वास सावंत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तर २०२०-२१ च्या दहावीच्या परीक्षेत प्रथम राज जनार्दन परब, द्वितीय गौरेश कृष्णा परब व राज श्रीराम मातोंडकर, तृतीय दीपक जयराम परब, इयत्ता पाचवीतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थीनी दिक्षिता रोहन मातोंडकर, इंस्पायर अवॉर्ड धारक विद्यार्थीनी स्नेहा कृष्णा जाधव, एनएमएमएस परीक्षेत मराठा गटातून शिष्यवृत्ती धारक विद्यार्थीनी रुची भालचंद्र मोहिते यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दिपेश परब तर प्रास्ताविक माजी विद्यार्थी रमेश गावडे यांनी केले.

You cannot copy content of this page