“माझी वसुंधरा अभियानात” सावंतवाडी नगरपरिषद कोकण विभागात अव्व्ल

आरोग्य विषयक स्पर्धेमध्ये हीच भूमिका ठेवल्यास आपल्या शहराचं नाव राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होईल : माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांचा विश्वास

सावंतवाडी ता.०५-:* माझी वसुंधरा अभियानात सावंतवाडी नगरपरिषदेणे कोकण विभागात मिळालेला अव्व्ल क्रमांक ही बाब शहर वासियांसाठी अभिमास्पद आहे. भविष्यात होणाऱ्या इतर आरोग्य विषयक स्पर्धेमध्ये हीच भूमिका अधिक जोमात वृद्धिंगत ठेवल्यास आपल्या शहराचं नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर अग्रतेने अधोरेखित होईल असा विश्वास माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी अभिनंदन करताना व्यक्त केला.

सावंतवाडी नगरपरिषदेला प्राप्त झालेल्या सदर पुरस्काराचे सर्व श्रेय हे शहरवासियांच्या मानसिकतेला, आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचारी आणि अधिकारी यांच्या अथक परिश्रमाला तसेच माजी पदाधिकाऱ्यांच्या संवेदनाशिलतेला दिले पाहिजे असेही त्यांनी व्यक्त केले

You cannot copy content of this page