देवघर धरण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-: भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या संदेशानुसार जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे व यापुढेही अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सद्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रामधून येणारे पाणी धरणातील उंबरठापातळी (179.50 मी.) पेक्षा पाणी पातळी जादा झाल्यानंतर धरणातून पाणी सांडव्यावरुन वाहणार आहे….
