⚡कणकवली ता.०८-: विद्यार्थ्यांच्या मनात शेतकरी म्हणजेच बळीराजा विषयी आदर निर्माण व्हावा.व शेतीबद्दल आवड निर्माण व्हावी.विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा वाढावी. व त्यांना प्रत्यक्ष शेतीच्या कामाचा अनुभव मिळावा या उद्देशाने जि प केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या विदयार्थी व शिक्षकांनी केळवली ता.राजापूर येथील शेतकरी सुरेश पवार यांच्या शेतावर “एक दिवस बळीराजासाठी” उपक्रमाअंतर्गत प्रत्यक्ष भातशेती कामात सहभाग घेतला.
केळवली येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रात्यक्षिक कार्यक्रमाला खारेपाटण जि प केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर,केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल,केंद्र मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर,शाळेचे पदवीधर शिक्षक संजय राऊळ, साह्ययक शिक्षिका श्रीम स्मिता कोरगावकर, श्रीम रेखा लांघी,श्रीम रुपाली पारकर,शाळा समितीचे माजी सदस्य सौ.पूजा कासलीवाल, पवन कासलीवाल, शेतकरी सुरेश पवार, सुभाष पवार उपस्थित होते.
खारेपाटण केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांचे तसेच केळवली येथील शेतकरी सुरेश पवार व श्री सुभाष पवार यांचे खारेपाटण केंद्र शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी प्रत्यक्ष बैलाचे जोत हाकवून नांगरणी करत चिखल केली.व विद्यार्थ्यांना शेतीविषयी प्रत्यक्ष माहिती दिली.व केळवली येथील प्रगतशील शेतकरी श्री सुरेश पवार यांनी देखील विद्यार्थ्यांनी शेतीविषयक विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शेतकरी सुरेश पवार यांचे सामूहिक आभार मानले.
