शिक्षक भारतीचा १० रोजी स्नेहमेळावा व सावित्री फातिमा कॅशलेस योजनेचा शुभारंभ

⚡कणकवली ता.०८-: शिक्षक भारती या संघटनेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हयात सावित्री फातिमा कॅशलेस कुटुंब स्वास्थ योजना शुभारंभ व कॅशलेस कार्ड वाटप तसेच कुडाळ तालुका स्नेहमेळावा १० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून ऑपरेशन युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिसेस प्रा. लि. (मुंबई) चे संचालक डॉ. नरेंद्र पाटील व पत्रकार शेखर सामंत, तर प्रमुख वक्ते महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे उपाध्यक्ष धनाजी पाटील असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती प्रमुख कार्यवाह तथा शिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर असणार आहेत.
तरी जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक भारती कुडाळ तालुका अध्यक्ष माणिक पवार, सचिव सुशिलकुमार कडुलकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख यज्ञा साळगावकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page