फोंडाघाट मार्गाचे खड्डे बुजवण्याच्या कामाला होणार सुरुवात

अनंत पिळणकर यांचा दणका;अधिकाऱ्यांनी मार्गाची केली पाहणी

⚡कणकवली ता.०८-: फोंडाघाट हवेलीनगर आयटीआय ते वैभववाडी तिठा पर्यंतचा मार्ग पूर्णतः खड्डेमय झाला आहे. या मार्गाची दुरुस्ती करण्याकरता फोंडाघाट येथील सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी आंदोलनाचा इशारा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांची भेट घेतली होती. पिळणकर यांनी तात्काळ बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज तात्काळ फोंडाघाट येथे संबंधित मार्गाची पाहणी केली आणि शनिवारपासून या मार्गाच्या खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्याचे संबंधित ठेकेदाराला आदेश दिले आहेत.

अनंत पिळणकर यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेवाळे, उप कार्यकारी अभियंता कर्वे यांच्याशी चर्चा करून ताबडतोब रस्त्याचे खड्डे बुजविण्याची मागणी केली होती. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजविले जातील असे सांगितले होते. कार्यकारी अभियंता आणि उप कार्यकारी अभियंता यांनी पिळणकर याना दिलेला शब्द पाळत शुक्रवारी तात्काळ पिळणकर यांची भेट घेऊन संबंधित मार्गाची पाहणी केली. या मार्गाच्या खड्डे बुजवण्याच्या कामाला शनिवारपासून सुरुवात करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला घटनास्थळावरून दिले.

You cannot copy content of this page