मठ येथील पुलाच्या कोसळलेल्या कठड्यची तहसिलदार प्रविण लोकरे यांनी भेट देत केली पाहण

⚡वेंगुर्ला ता.०८-: मठ श्री देव स्वयंभू मंदिर नजिकच्या पुलाच्या कठड्यासह रस्त्याचा भाग सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळला होता. याठिकाणी तहसिलदार प्रविण लोकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर पावसाळा सुरु असल्याने तात्पुरती डागडुजी करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग अधिका-यांना दिल्या.

  तहसिलदार यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन जोरदार पाऊस असल्याने संबंधित रस्त्याचा भाग आणखी कोसळू नये व परबवाडा व सिध्दार्थनगर या वाड्यांचा संफ तुटू नये यासाठी तात्पुरती डागडुजी करण्यात यावी. उर्वरित आवश्यक काम पावसाळा परिस्थितीनुसार करण्यात यावे, अशी सूचना संबंधित विभागाला केली. सदर रस्त्याशेजारी तात्पुरती भराव टाकण्याचे काम सुरु करणार असल्याचे जि.प. कनिष्ठ अभियंता यांनी सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, मंडळ अधिकारी चव्हाण, जि.प.कनिष्ठ अभियंता विनायक चव्हाण, सरपंच तुळशीदास ठाकूर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
You cannot copy content of this page