कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात केली कारवाई
⚡कणकवली ता.०८-: कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले दोन दिवस पोलीस बंदोबस्त कार्यरत आहे. या बंदोबस्ताचा आढावा घेण्याकरता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले. या दरम्यान कर्णकर्कश आवाज करणाऱ्या तीन बुलेट स्वरांना थांबवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
कणकवली पटवर्धन चौकात कार्यरत असणारे वाहतूक पोलीस चंद्रकांत माने यांना या चौकात बोलावून घेत तीन बुलेट स्वरांना प्रत्येकी 1000 याप्रमाणे एकूण 3000 हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकात नव्याने बसवलेल्या पुतळ्यामुळे कोणताही वाद निर्माण होऊ नये याकरिता पोलीस बंदोबस्त कार्यरत असून, जुन्या पुतळ्याला कोणताही धोका होऊ नये या दृष्टीनेही पोलीस खबरदारी घेत आहेत. या साऱ्याचा आढावा घेण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक श्री बगाटे हे चौकात आले असता अचानकच हे तीन बुलेट स्वार त्यांच्या पुढ्यात आल्याने बगाटे यांनी या तिघांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले. व ती कारवाई झाली देखील.अप्पर पोलीस अधीक्षक आले बंदोबस्ताच्या आढाव्याला मात्र त्याचा फटका बसला बुलेट स्वरांना. या कारवाईची चर्चा मात्र कणकवली सुरू होती.
