⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-: भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या संदेशानुसार जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे व यापुढेही अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सद्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रामधून येणारे पाणी धरणातील उंबरठापातळी (179.50 मी.) पेक्षा पाणी पातळी जादा झाल्यानंतर धरणातून पाणी सांडव्यावरुन वाहणार आहे. त्यामुळे नदीपात्रामध्ये पाणी पातळीत वाढ होणार आहे.
तसेच धरण क्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्रातील पाणी नदीपात्रात येवून नदीपात्राची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नदीपात्रात उतरू नये व सावधानता बाळगावी अशा इशारा हर्षद यादव, कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभागिय पथक, आंबडपाल, कुडाळ यांनी दिला आहे.
00000
