Headlines

प्रवासी संघटनेने एस टी चालकाचा केला सरप्राइज वाढदिवस

कर्तव्यावर असताना वाढदिवस साजरा करीत केला सन्मान देवगड ता.१४-:देवगड आगारात चालक सेवेत असलेले चालक विनोद चंद्रकांत हळदणकर यांचा ५१ वा वाढदिवस तळेबाजार येथील दत्तप्रसाद जोईल प्रवासी मित्रमंडळाकडून आकस्मिक पणे रात्रौ ९ वा. कणकवली देवगड प्रवासी फेरी वर सेवा बजावीत असताना भर रस्त्यावर अचानक गाडी थांबवून चालक श्री हळदणकर याना गाडीतून खाली उतरवून घेतले व केक…

Read More

दहावी, बारावी गुणवंत दिव्यांग मुलांचा सत्कार

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत देवगड पंचायत समितीचा उपक्रम ⚡देवगड ता.१४-: पंचायत समिती देवगड, समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत 12 वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दिव्यांना प्रमाणपत्र धारक गुणवंत दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक 14/07/2022 रोजी छत्रपती संभाजी महाराज सभागृह पंचायत समिती देवगड येथे आयोजित करण्यात आलेला होता. सदर गुणगौरव सोहळ्यामध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या प्रमाणपत्र धारक…

Read More

सिंधुदुर्ग दिगंबर जैन समाजाने माताजींचे घेतले आशीर्वाद

निमित्त गुरू पौर्णिमेचे देवगडसिंधुदुर्ग दिगंबर जैन समाज बांधवांनी गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून हातकणंगले तालुक्यात अतिशय क्षेत्र श्री कुंथुगिरी (आळते) येथे येथील गणाचार्य,गणाधिराज १०८ श्री आचार्य श्री कुंथुसागरजी महाराज यांची भेट घेऊन दर्शन व आशीवाद घेतले.तसेच भगवंता वर अभिषेक केला.व मातांजीचे आशीर्वाद घेतले.या वेळी अखिल भारतीय दिगंबर जैन समाज संस्था अध्यक्ष दयानंद मांगले,(देवगड)सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रकाश…

Read More

हडपीड स्वामी समर्थ मठाच्यावतीने शिलाई मशिनचे वाटप

⚡देवगड ता.१४-: श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड यांच्या वतीने दहीबाव दळवीवाडी येथील गरजू महिला सौ. पूजा हेमंत दळवी यांना उदरनिर्वासाठी मठाच्या वतीने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हडपीड येथील स्वामी समर्थ मठाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम नियमित…

Read More

बांद्यात माकडाचा हैदोस : सलूनचे बेसुमार नुकसान

⚡बांदा ता.१४-: बांदा शहरात माकडांचा उच्छाद सुरुच आहे. कट्टा कार्नर येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सलूनमध्ये माकडाने आरसा व इतर सामानाची नासधूस केली. यात सुमारे ७ हजारांचे नुकसान झाल्याचे सलून मालक नाना कदम यांनी सांगितले. सायंक‍ाळी उशिरा बांदा वनपाल अनिल मेस्री यांना स्थानिक व्यापार्‍यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. माकडाचा लवकरच बंदोबस्त केला जाईल…

Read More

निस्वार्थी जनसेवा करणाऱ्या संदेश पारकर यांचा भविष्यकाळ उज्वल

माजी केंद्रीय मंत्री अँड.रमाकांत खलप यांनी केले कौतुक; वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा ⚡कणकवली ता.१४-: जनतेशी साधर्म्य राखत निस्वार्थी सेवा बजावणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमीच आशीर्वादरुपी पाठबळ मिळते.संदेश पारकर यांच्या रूपाने असेच नेतृत्व जिल्हयात निर्माण झाले असून संदेश पारकर यांचा भविष्यकाळ हा उज्वल आहे.कोकणच्या भूमीतून सोन्यासारखी माणसे निर्माण होतात त्यातीलच संदेश पारकर हे व्यक्तिमत्व असून त्यांचे संकल्प येत्या…

Read More

नगर वाचन मंदिर मालवण तर्फे शालेय गणवेश वितरण

⚡मालवण ता.१४-: मालवण येथील नगर वाचन मंदिर आणि कै. राधाबाई हरश्चिंद्र नारिंग्रेकर पुस्तक पेढी अंतर्गत मालवण शहर आणि परीसरातील प्रशालेमधील एकूण ५६ विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. नगर वाचन मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह प्रा. नागेश कदम, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी शिक्षक व संस्थेचे हितचिंतक विनायक कोळंबकर, ग्रंथपाल संजय…

Read More

१८ ते ५९ वर्षासाठी उद्या कोविशिल्ड बूस्टर डोस

बांदा आरोग्य केंद्रात आयोजन;डॉ जगदीश पाटील व सरपंच अक्रम खान यांचे लाभ घेण्याचे आवाहन बांदा/प्रतिनिधी१८ ते ५९ वयोगटातील सर्व नागरिकांसाठी उद्या बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मोफत कोविशिल्डचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे त्यांनी बूस्टर डोस आरोग्य केंद्रात…

Read More

बांदा वीज वितरण कार्यालयावर उद्या शिवसेनेची धडक

शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर यांची माहिती बांदा/प्रतिनिधीमहावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे बांदा शहरात गेले काही दिवस विजेचा लपंडाव सुरु आहे. आज दिवसभर वीज पुरवठा खंडित असल्याने याचा नाहक त्रास ग्राहकांना होत आहे. कंपनीचे अधिकारी समर्पक उत्तरे देत नसल्याने उद्या शुक्रवारी महावितरणच्या बांदा विभागीय कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने धडक देणार असल्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य…

Read More

तृतीयपंथीयांच्या पाठीशी प्रशासन खंबीर,समाजानेही पुढे यावे

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी;समाजात मानाचे स्थान देवू, मुख्य प्रवाहात जगण्याचा अधिकार देवू – ॲड दिलशाद मुजावर ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: तृतीयपंथीयांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. समाजानेही पुढे येवून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी तसेच समाजात माणसाप्रमाणे त्यांना मानाचे स्थान देवूया. मुख्य प्रवाहात जगण्याचा अधिकार देवूया, असे आवाहन विधीज्ञ दिलशाद मुजावर यांनी…

Read More
You cannot copy content of this page