माजी केंद्रीय मंत्री अँड.रमाकांत खलप यांनी केले कौतुक; वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा
⚡कणकवली ता.१४-: जनतेशी साधर्म्य राखत निस्वार्थी सेवा बजावणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमीच आशीर्वादरुपी पाठबळ मिळते.संदेश पारकर यांच्या रूपाने असेच नेतृत्व जिल्हयात निर्माण झाले असून संदेश पारकर यांचा भविष्यकाळ हा उज्वल आहे.कोकणच्या भूमीतून सोन्यासारखी माणसे निर्माण होतात त्यातीलच संदेश पारकर हे व्यक्तिमत्व असून त्यांचे संकल्प येत्या काळातपूर्ण होतील आणि संदेश पारकर यांच्या रूपाने सिंधुदुर्गला विकासात्मक दिवस येतील असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री अँड.रमाकांत खलप यांनी व्यक्त करतानाच संदेश पारकर यांचे नाते संबंध गोव्याशी असून त्यांचा मामा या नात्याने भाच्याला आशीर्वाद देण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात अँड खलप बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आम वैभव नाईक,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे,बाळा भिसे,सौ.समृद्धी पारकर,देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू,उपनगराध्यक्ष सौ.सावंत नगरसेविका हर्षदा ठाकूर सुमेधा अंधारी,माजी जी.प.सदस्य संजय आंग्रे,रुपेश पावसकर,सुदाम तेली,शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये,तालुका प्रमुख शैलेश भोगले,मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर,शहर प्रमुख शेखर राणे,अपर्णा कोठावळे,प्रसाद अंधारी,अवधूत मालणकर,अनुज्ञा मालवणकर,सुनील काकडे,आदिनाथ ढमाले,अँड.हर्षद गावडे,नगरसवेक रुपेश नार्वेकर,कन्हैया पारकर आदी उपस्थित होते.
श्री.खलप पुढे म्हणाले,कणकवलीच्या नावात काही अर्थ आहे.यातून याचा सबंध सोन्याशी असल्याचा भास होतो.म्हणूनच कोकणच्या भूमीतील माणसाशी जेव्हा संपर्क येतो. तेव्हा सोन्यासारखी माणसे भेटतात. कारण या भूमीचा तो गुण आहे.सोन्याचे कण या मी,माणसात पाहिले आहेत.म्हणूनच या भूमीने इतकी रत्ने निर्माण केली.संदेश पारकर याची सेवाभावीवृत्ती,सामाजिक काम,जनतेशी असलेली नाळ यामुळे ते निश्चित पणे आमदार होतील.मात्र काही काळ जावा लागेल. तुम्ही चांगले काम करत रहा. संधी निश्चित पणे चालून येईल गोमंतकाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.त्यामुळे हा मामा आपल्या भाच्याला आशीर्वाद देत आहे.
आम वैभव नाईक म्हणाले,पद असो अथवा नसो मात्र ज्याच्या वाढदिवसाला लोक उपस्थित राहतात. असा एकमेव नेता म्हणजे, संदेश पारकर होय. हि त्यांची ओळख पुरेशी आहे.गेले ३० वर्षे सलग सामाजिक उपक्रमाद्वारे आपण जनतेचे देणे लागतो.या भावनेतून संदेश पारकर यांचा वाढदिवस सोहळा म्हणून साजरा होत आहे.संघर्ष कितीही करावा लागला तरी आमची तयारी आहे.अशा प्रकारचे व्यक्तिमत्व असून दुरदैवाने राष्ट्रवादी मध्ये त्यांना न्याय मिळाला नसला तरी शिवसेनेला त्यांच्या कार्याची जाण आहे.पारकर आमदार नसले तरी आमदार असल्या सारखे त्याच्या पाठीशी असलेली कार्यकर्ते पाहिल्यावर एक नवीन ऊर्जा प्राप्त होते.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला.परंतु दुरदैवाने सरकार कोसळले.पारकर यांनी शिवसेना वाढीसाठी जोमाने काम करावे त्याचे फळ निश्चितच त्यांना भेटेल असा विश्वास व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
सतीश सावंत म्हणाले, संदेश पारकर यांचे नावच मुळात संघर्ष पारकर असे हवे होते कारण संदेश पारकर आणि संघर्ष याचा जवळचा सबंध आहे.दिलदार व्यक्तिमत्व,सामाजिक भान,मैत्रीला जागणारा मित्र असे हे नेतृत्व असून टोल माफीचा प्रश्न असो .वा छत्रपतींचा पुतळा स्थलांतराचा विषय असो. कोणता हि प्रश्न धसास लावणे हा पारकर याचा स्वभाव असल्याचे सांगताना कणकवली नगरपंचायतीवर भगवा फटकवण्याचा संकल्प यानिमित्ताने करूया असे त्यांनी सांगितले.
सुशांत नाईक म्हणाले,गेली २५ वर्षे सातत्याने समाज उपयोगी काम करीत तितक्याच गर्दीत कार्यक्रम साजरे करणारे संदेश पारकर हे एकमेव नेते आहेत.केवळ कणकवलीच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हात त्यांचे कार्यक्षेत्र आहे .ह्याची प्रचिती जिल्हा बँक निवडणुकीत आपणाला आली. असल्याचे सांगताना ते म्हणाले,संदेश पारकर यांचा पुढील वाढदिसव कणकवली नगरपंचायतीवर भगवा फडकवून साजरा करूया असा संकल्प आपण सर्वानी करूया असे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे तसेच ,माजी जी.प.सदस्य बाळा भिसे यांनी संदेश पारकर यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी गुणवंत,विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.त्याच प्रमाणे तालुक्यातील महिला बचत गटांचा सन्मान करत भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. मान्यवराच्या उपस्थितीत केक कापून पारकर यांना शुभेच्छा दिल्या.
