दहावी, बारावी गुणवंत दिव्यांग मुलांचा सत्कार

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत देवगड पंचायत समितीचा उपक्रम

⚡देवगड ता.१४-: पंचायत समिती देवगड, समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत 12 वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दिव्यांना प्रमाणपत्र धारक गुणवंत दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक 14/07/2022 रोजी छत्रपती संभाजी महाराज सभागृह पंचायत समिती देवगड येथे आयोजित करण्यात आलेला होता. सदर गुणगौरव सोहळ्यामध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या प्रमाणपत्र धारक तीन दिव्यांग विद्यार्थी व इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या अकरा दिव्यांग विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक यांना उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सदर गौरव सोहळ्यास विद्यार्थी त्यांचे पालक व शिक्षक उपस्थित होते.

इयत्ता 12 वीतील कु. रोहिणी संतोष दाभोलकर, माध्यमिक विद्यालय विठ्ठलादेवी. कु. आदित्य विनेश कदम, शिरगाव हायस्कूल, शिरगाव. कु. हर्षद संदिप किंजवडेकर, शिरगाव हायस्कूल, शिरगाव. तसेच इयत्ता 10 वीतील कु. साक्षी संतोष मिठबावकर, आदर्श विद्यामंदिर किंजवडे. कु. जीवन सुरेश गुरव, शांताराम विष्णू कुलकर्णी माध्यमिक विद्यामंदिर मोंड. कु. गुरुप्रसाद भरत चव्हाण, शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल देवगड. कु. अमृता बाबुराव ढोके, शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल देवगड. कु. गायत्री संदिप लोंबर, माध्यमिक विद्यालय विजयदुर्ग. कु. साक्षी दिलीप शेगडे, श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे. कु. भावेश जगदीश वाघट, माध्यमिक 12 वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दिव्यांना प्रमाणपत्र धारक गुणवंत दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा12 वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दिव्यांना प्रमाणपत्र धारक गुणवंत दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विद्यामंदिर कुणकेश्वर. कु. रोहित काशीराम मटकर, शिरगाव हायस्कूल, शिरगाव. कु. जयेश सुनील लाड, माध्यमिक विद्यामंदिर टेंबवली. कु. सानिका संजय घाडी माध्यमिक विद्यामंदिर टेंबवली. कु. साहिल मालंडकर, आले हायस्कूल या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
तसेच सदर कार्यक्रम प्रसंगी श्री नरेंद्र महाले उप अभियंता बांधकाम, श्री संतोष बिर्जे कक्षा अधिकारी, श्रीमती मेधा राणे अधीक्षक, श्री प्रजापती थोरात गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देवगड उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गट साधन केंद्रातील विशेषतज्ञ व विशेषतज्ञ श्री सुदाम जंजाळ, श्री नागोजी आवडणकर, श्री नारायण चव्हाण, श्री अजय परब, श्री दत्तात्रय घाडी, श्री मंगेश आरेकर, श्री योगेश डोईफोडे, श्री भाऊराव गायकवाड, श्रीमती सायली मोंडकर, श्रीमती अनुराधा कदम, श्रीमती ममता जोगल, यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page