कर्तव्यावर असताना वाढदिवस साजरा करीत केला सन्मान
देवगड ता.१४-:
देवगड आगारात चालक सेवेत असलेले चालक विनोद चंद्रकांत हळदणकर यांचा ५१ वा वाढदिवस तळेबाजार येथील दत्तप्रसाद जोईल प्रवासी मित्रमंडळाकडून आकस्मिक पणे रात्रौ ९ वा. कणकवली देवगड प्रवासी फेरी वर सेवा बजावीत असताना भर रस्त्यावर अचानक गाडी थांबवून चालक श्री हळदणकर याना गाडीतून खाली उतरवून घेतले व केक कापून साजरा केला.अचानक आपला वाढदिवस प्रवासी मित्रांकडून साजरा करण्यात आल्याने ते भारावून गेले.
प्रसंगी या गाडीतून सेवा बजाविणारे वाहक व्ही.बी .कांदे,प्रवासी विशेष कार्यकारी अधिकारी दयानंद मांगले,चालक हनिफ साटविलकर अन्य प्रवासी वर्गाने चालकाला शुभेच्छा व्यक्त केल्या.
चालक विनोद हळदणकर हे देवगड बोरिवली या रातराणी प्रवासी फेरीवरील सुपरिचित शांत सयंमी सौजन्याने वागणारे चालक म्हणून प्रवासी वर्गात लोकप्रिय असून नियमित प्रवासी फेरी वर देवगड नाटे पावस मार्गे रत्नागिरी ,कणकवली,सावंतवाडी या मार्गावर देखील प्रवासी वर्गाला सौजन्याने वागणूक देतात .भर रस्त्यात गाडी थांबवून केक कापून एसटी चालकाचा वाढदिवस प्रवासी मित्रांनी साजरा करणे हा पहिलाच प्रकार असून आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर ,तसेच सर्व अधिकारी कर्मचारी वर्गातूनही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
