देवगड-प्रतिनिधी
प्रधामंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत पडेल मधील कुटुंबाला दोन लाखांचा धनादेश
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा- पडेल यांनी पडेल येथील चिराग प्रभाकर तानावडे यांना दोन लाखाचा धनादेश सुपूर्द केला आहे.
प्रभाकर तानवडे यांचे 4 जानेवारी 2022 रोजी निधन झाले निधनाचे वृत्त समजल्यावर जिल्हा बँकेच्या पडेल शाखेकडून विम्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर तो मंजूर होवून रुपये 2 लाख रकमेचा धनादेश पडेल शाखेकडे वारस चिराग तानवडे यांना जिल्हा बँक संचालक ॲड. प्रकाश बोडस यांच्या हस्ते सुपूर्द करणेत आला. यावेळी देवगड शाखा व्यवस्थापक गोडवे, पडेल शाखा व्यवस्थापक पडेलकर, पडेल सोसायटी सचिव घाडी, इत्तर मान्यवर व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो- प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत वारस चिराग तानवडे यांच्याकडे दोन लाखांचा धनादेश सूपुर्द करताना जिल्हा बँक संचालक ॲड. प्रकाश बोडस छाया-वैभव केळकर
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत दोन कुटुंबाला लाखाची मदत
