गुरुपौर्णिमा निमित्त सैनिक स्कूल आंबोलीत हवालदार दत्ता देसाई यांचा सत्कार

आंबोली,ता.१५: गुरू पौर्णिमा निमित्त सैनिक स्कूल आंबोली मध्ये कार्यक्रम उत्साहात झाला.यावेळी पोलीस हवालदार दत्ता देसाई यांचा शौर्या बद्दल सत्कार करण्यात आला. सैनिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा निमित्त वकृत्व स्पर्धा आयोजित केली होती.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंबोली पोलीस हवालदार दत्ता देसाई याना बोलावले होते,त्यांचा सत्कार त्यांनी शौर्य दाखवून वाहत्या नदीतून एका महिलेला वाचावल्याबद्दल शाळेच्या वतीने सन्मान चिन्ह दाखवून करण्यात आला.

यावेळी श्री देसाई म्हणाले,आयुष्यात गुरूचे महत्व मोठे असते,आई वडील हे प्रथम गुरू नंतर शिक्षक आणि त्यानंतर आपल्याला मिळालेले शिकवणारे आणि ज्याच्या माध्यमातून आपण यशस्वी होताना दिलेले उपदेश.त्यामुळे आई वडिलांचे नाव मोठे करा आणि जीवनात शिस्त आणि चारित्र्याचे पालन करा,असे प्रतिपादन केले.यावेळी प्राचार्य सुरेश गावडे यांनीही प्रास्ताविक केले.यावेळी वकृत्व स्पर्धेतील लहान गट कॅडेट प्रथम नील हेगीस्टे,प्रथमेश नाईक व अथर्व डांगी यांना द्वितीय,देवेश परब यांना तृतीय क्रमांक देण्यात आला.मोठा गट प्रथम क्रमांक कॅडेट तनुष राऊत प्रथम,गोविंद गवस द्वितीय,दक्ष पाटील तृतीय क्रमांक देण्यात आला.यावेळी सैनिक स्कूल चे सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंद,विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page