निमित्त गुरू पौर्णिमेचे
देवगड
सिंधुदुर्ग दिगंबर जैन समाज बांधवांनी गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून हातकणंगले तालुक्यात अतिशय क्षेत्र श्री कुंथुगिरी (आळते) येथे येथील गणाचार्य,गणाधिराज १०८ श्री आचार्य श्री कुंथुसागरजी महाराज यांची भेट घेऊन दर्शन व आशीवाद घेतले.तसेच भगवंता वर अभिषेक केला.व मातांजीचे आशीर्वाद घेतले.
या वेळी अखिल भारतीय दिगंबर जैन समाज संस्था अध्यक्ष दयानंद मांगले,(देवगड)सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रकाश (सुनील)त्रिभुवणे,सदस्य प्रदिप (बाबू)दंताळ (कणकवली)यांचे समवेत स्थानिक जेष्ठ जैन बांधव दिलीप मालगत्ते उपस्थित होते.या नंतर अतिशय क्षेत्र बाहुबली येथे जाऊन भगवंताचे दर्शन घेतले.
