कार धुण्यासाठी समुद्रात नेणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई
⚡मालवण ता.२५-: मालवणात आलेल्या पर्यटकांनी कार धुण्यासाठी थेट समुद्रात नेल्याची घटना काल घडली असताना याप्रकरणी मालवण पोलिसांनी संबंधित कार चालकाला १५०० रुपयांचा दंड केला आहे. मालवण समुद्र किनारी काल पर्यटकांनी आपली कार धुण्यासाठी थेट समुद्रात लोटली. यावेळी कार मातीत रुतल्याने पर्यटकांची फसगत झाली. यावेळी स्थानिक नागरिकांनी ही कार पाण्याबाहेर आणली. पर्यटकांनी कार समुद्र किनारी नेण्याच्या…
