Headlines

तबला परीक्षेत अनंत संगीत शाला संस्थेच्या विद्यार्थ्यांचे सुयश ​…

⚡​मालवण ता.२३-:
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई यांच्या वतीने मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या तबला परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल मधील ‘अनंत संगीत शाला’ या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये टोपीवाला हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या एकूण ९ विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवरील परीक्षांमध्ये उत्तम श्रेणी मिळवून संस्थेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.

​अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे २०२३ साली सुरू झालेल्या अनंत संगीत शाला या संस्थेचे विद्यार्थ्यांना तबलावादन आणि कथ्थक नृत्य या कलांचे अधिकृत मार्गदर्शन लाभते. या कलांच्या परीक्षांमधील यशामुळे विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत बोर्डाचे अतिरिक्त गुण (कला क्रीडा सवलत) मिळण्यास मोठी मदत होते.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई यांच्या वतीने मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या तबला परीक्षेत अनंत संगीत शाला संस्थेने सलग तिसऱ्या वर्षी यश मिळविले आहे. यामध्ये ​टोपीवाला हायस्कूलचे विद्यार्थी: ​किरण गोसावी – प्रवेशिका प्रथम (विशेष योग्यता – Distinction), ​श्लोक सामंत- प्रवेशिका प्रथम (विशेष योग्यता – Distinction), ​आर्या फोंडेकर- प्रारंभिक (प्रथम श्रेणी), ​गौरी वस्त- प्रारंभिक (प्रथम श्रेणी), ​अनिमिष पवार – प्रारंभिक (प्रथम श्रेणी), ​कौस्तुभ मेस्त्री- प्रवेशिका पूर्ण (प्रथम श्रेणी), ​मंदार जोशी- मध्यमा प्रथम (द्वितीय श्रेणी), ​टोपीवाला कॉलेजचे विद्यार्थी: ​भावेश वराडकर- मध्यमा पूर्ण (प्रथम श्रेणी), ​निनाद तेंडोलकर- मध्यमा प्रथम (द्वितीय श्रेणी) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

या ​विद्यार्थ्यांना तबला विशारद व मार्गदर्शक शिक्षक सुधीर गोसावी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. ​या यशाबद्दल मालवण एज्युकेशन सोसायटीचे सचिव विजय कामत, सदस्य दिगंबर सामंत, स्कूल कमिटी अध्यक्ष शैलेश खांडाळेकर, शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू आणि पर्यवेक्षक देविदास वेरलकर यांनी आदी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक सुधीर गोसावी यांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page