⚡कणकवली ता.२५-: माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडी या प्रशालमध्ये इ 10वी व 12वी च्या परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विदयार्थ्याचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला. 12 वी मध्ये नेत्रदिपक यश संपादन करणाऱ्या व प्रशालमध्ये प्रथम येणान्या संगिता संजय काळींगण ,द्वितीय किरण किशोर चव्हाण व तृतीय दिव्या दिलीप कदम तसेच इ. 10 वी मध्ये प्रथम दिव्या सचिन मगर, द्वितीय सिद्धी अभिमन्यू लाड व त्तृतीय सुवर्णा दिपक चव्हाण या सर्वांना संस्थेमार्फत भेट वस्तू देवून गौरविण्यात आले तसेच यशस्वी विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना देखील भेटवस्तू देवून गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सुदाम तेली हे होते तसेच कार्यक्रमास संस्था अध्यक्ष मधुकर वाडेकर, उपाध्यक्ष विष्णू चिंदरकर, सदस्य दत्ताराम हिंदलेकर , आनंदराव साटम,पांडूरंग मगर,विश्राम लाड, अण्णा परुळेकर व पालक उपस्थित होते.पालक सचिन मगर यांनी मनोगत व्यक्त करताना मुलांची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. संस्था अध्यक्ष श्री. वाडेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आजवरच्या निकालापेक्षा यावर्षी मिळालेल्या भरघोस यशाचे कौतुक केले. प्रत्येक विदयार्थ्याने शाळेच अभ्यासा बरोबर कौशल्याकडेही लक्ष दयावे असे संबोधले.
अध्यक्षीय भाषणात सुदाम तेली यांनी विदयार्थ्यानी असेच या नेहमी संपादन करावे. यशस्वी होण्या साठी खूप मेहनत घ्यावी लागले तेव्हा कुठे यश मिळते. त्या यशाचे नेहमी सातत्य ठेवावे असे आव्हान केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत प्रशालेचे प्राचार्य सुमुख जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. आदिमाया सावंत व शंकर रासम यांनी केले. तर आभार- प्रगती परब यांनी केले.
