भाजप सातार्डा शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव : अन्यथा स्वातंत्रदिनी आंदोलन छेडणार : कोरे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्याकडे केली मागणी
⚡बांदा ता.२५-: कोकण रेल्वे मार्गावरील मडुरा स्थानकावर सर्व गणपती स्पेशल गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी भाजपचे सातार्डा शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव यांनी कोरे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन बेलापूर येथील कोरेच्या प्रधान कार्यालयात लिपीक अमोल कदम यांच्याकडे सुपूर्द केले. गाड्यांना थांबा मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती यशवंत माधव यांनी दिली. तसेच केंद्रीय सुक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनाही हे निवेदन सादर केले आहे.
गणपती स्पेशल सर्व गाड्यांना मडुरा स्टेशनवर थांबा देण्यासाठी त्वरीत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा कोणतीही नोटीस न देता १५ अॉगस्ट रोजी समस्त नागरिकांसमवेत मडुरा स्टेशन आवारात बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.
