त्या’ आठ शिक्षकांना निवृत्ती वेतनाचे सर्व लाभ तात्काळ द्या

सेवानिवृत्त शिक्षक प्रतिनिधी सुरेश पेडणकर यांनी दिली माहिती

⚡कणकवली ता.२५-: महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदांकडे ०१ / ०७ / १ ९ ७२ अथवा त्यानंतरच्या दिनांकाला सेवेत रुजू होऊन अप्रशिक्षित म्हणून सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाने निवृत्ती वेतन नाकारले होते त्यासाठी त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे यांनी उच्च न्यायालय व सर्वोच न्यायालय येथे दाद मागून त्यांना निवृत्ती वेतनासह सर्व लाभ मंजूर करण्याबाबत आदेश प्राप्त करून घेतले . तरीही महाराष्ट्र शासनाकडून त्याबाबतचे आदेश नसल्यामुळे जिल्हा परिषदा आपल्याकडील निवृत्त कर्मचाऱ्याना हा लाभ देण्यास तयार नाहीत , यासाठी पेन्शनर्स असोसिएशनने महाराष्ट्र शासनाकडे वारंवार दाद मागितली.

अखेर महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने दि . १५/०७/२०२२ च्या परिपत्रकाने ईमेल करून सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषदा ( सर्व ) यांना अशा सर्व शिक्षकांचा आपल्या जिल्ह्यामध्ये शोध घेऊन त्यांना तात्काळ लाभ मंजूर करण्याबाबतचे आदेश दिले आहेत . त्याची प्रत शिक्षक प्रतिनिधी सुरेश पेडणकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची समक्ष भेट घेऊन सादर केली . तसेच या जिल्ह्यातील आठ शिक्षकांना निवृत्ती वेतनाचे सर्व लाभ तात्काळ देण्यात येण्यास विनंती केली आहे . अशी माहिती चंद्रकांत अणावकर , सुधाकर देवस्थळी , बाबू परब , सोनू नाईक व विश्वनाथ परब यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे .

You cannot copy content of this page