सभासद नोंदणीचा विक्रम करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करणार

आमदार वैभव नाईक यांनी दिली माहिती

⚡कणकवली ता.२५-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रमांबरोबरच शिवसेना सभासद नोंदणीचा विक्रम करून साजरा केला जाणार आहे अशी माहिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

शिवसेनेतून आमदार खासदार फुटले असले तरी शिवसैनिक हे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी ठाम आहेत. शिवसेनेला जनतेतूनही मोठा पाठींबा मिळत आहे. उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त सभासद नोंदणीची भेट देण्याचे आवाहन केले असून त्यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात शिवसेना सभासद नोंदणी केली जाणार आहे असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page