जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती
ओरोस ता.२५-:
दुग्धव्यवसायात यशस्वी होणेसाठी चांगल्या प्रतिची संकरीत जनावरे खरेदीबरोबरच त्यांचा निवारा व व्यवस्थापन हा यशस्वी दुग्ध व्यवसाय होणेचे महत्वपूर्ण कारण आहे. यासाठीच संकरीत दुधाळ जनावरांच्या संगोपनासाठी आदर्श गोठा बांधणी करीता सुधारीत कर्जयोजना तयार करण्यात आल्याची माहीती जिल्हा बँक अध्यश मनिष दळवी यांनी दिली.
जिल्हा बँके मार्फत दुध उत्पादक शेतक-यांसाठी जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील संकरीत दुधाळ जनावरे खरेदीसाठी कर्ज योजना राबवली जाते. दुधउत्पादक शेतकरी कर्ज स्वरूपात जनावरे खरेदी करतात. बँकेच्या वर्धापन दिनानिमत्त झालेल्या कार्येक्रमात जिल्ह्यातील १०१ दुध उत्पादक शेतक-यांना राज्याबाहेरील संकरीत दुधाळ जनावरे खरेदीसाठी कर्ज वितरण करण्यात आले त्याच वेळी दुध संस्थाचालकांनी बँकेमार्फत दुधाळ जनावरांच्या निवा-यासाठी गोठा बांधणीसाठी दिर्घ मुदत कर्ज वितरण करण्यात यावे अशी मागणी केली.तसेच दुधउत्पादक शेतक-यास कर्जाचा हप्ता कमी होवून कर्ज फेड करण्यास सुलभता होईल तसेेच कर्जास आर्थिक मागास महामंडळाकडून व्याज परतावा मिळावाअशीही मागणी केली होती.
यामागणीच्या अनुषंगाने बँकेचे अध्यश मनिष दळवी यांनी संकरीत दुधाळ जनावरांच्या संगोपनासाठी आदर्श गोठा बांधणी करीता सुधारीत कर्ज योजना तयार केली जाईल असे सभेसमोर जाहीर केले होते .त्यानुसार सदर योजना आता जिल्हा बँकेमार्फत जाहीर करण्यात आली आहे. संकरीत दुधााळ जनावरे संगोपन करणा-या शेतक-यांसाठी आदर्श गोठ्यासाठी प्रती चौ फुट ५०० रुपयांचे ८० टक्के याप्रमाणे गोठा बांधकामासाठी प्रती चौ.फुट ४०० रुपये प्रमाणे कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे किंवा प्रति दुधाळ जनावर १६ हजार रुपये प्रमाणे कर्ज पुरवठा केला जाणार आहे. या कर्जासाठी व्याज दर संस्थेसाठी ८.५० टक्के, सभासद १० टक्के तर थेट कर्जासाठी १० टक्के इतका राहाणार आहे, असे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी म्हटले आहे.
