Headlines

पिंगुळीत ठाकर ग्रामस्थ मंडळा तर्फे साहित्यिक संवाद कार्यक्रम…

⚡कुडाळ ता.२३-: तालुक्यात पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळ पिंगुळी आयोजित साहित्यिक संवाद कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिकांनी साहित्याबाबत मार्गदर्शन करत  तसेच विविध कविता सादर करत रसिकांची मने जिंकली. प्रत्येकाने साहित्य जोपासा. वाचन संस्कृती आत्मसात करा. वाचनामुळेच आपण अधिक बुद्धिवान होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मोहन रणसिंग यांनी केले.
    आपल्या समाजातील काही ज्येष्ठ साहित्यिकांनी विविध साहित्यिक व्यासपीठावर आपल्या प्रतिभेने समाजाबाहेर नावलौकिक मिळवला आहे, परंतु आपल्याच समाजातील असलेल्या या ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्याचा अनुभव घेण्याची संधी  आपल्या समाज बांधवांना मिळालेली  नव्हती, म्हणून प्रथमच ७५ वर्षावरील जेष्ठ साहित्यिकांना एकाच  व्यासपीठावर आमंत्रित करून त्याच्याशी संवाद साधण्याची संधी पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळ पिंगुळी गुढीवाडी यांनी येथील
जेष्ठ साहित्यिक ना. बा. रणसिंग, मोहन रणसिंग, डॉ अ. ना रसनकुटे,यांचा साहित्यिक संवाद कार्यक्रम श्री देवी भद्रकाली मंदिरात मंडळाचे अध्यक्ष भगवान रणसिंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता.
यावेळी पिंगुळी उपसरपंच मंगेश मसके, सचिव भरत ठाकूर,  मंडळाचे सदस्य विठ्ठल सिंगनाथ, प्रकाश पांगुळ, शंकर मसके, विकास ठाकूर माजी सरपंच सौ. भारती रणसिंग, जेष्ठ कलाकार सुरेश रणसिंग, महादेव सिंगनाथ, मनोहर ठुंबरे,  दादा मसके, रणजीत रणसिंग, गंगा ठुंबरे, अच्युत मस्के, शिवदास मसके, प्रकाश अटक, तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी साहित्यिक रसनकुटे यांनी अतिशय सुंदर कविता सादर केल्या. साहित्यिक क्षेत्रात लिखाणाचे वेड कसे लागले, याबाबत त्यांनी सांगितले. मोहन रणसिंग यांनी आपले भाषा कौशल्य वापरून प्रेक्षकांशी एकरूप झाले पाहिजे. प्रेक्षकांशी संवाद साधला पाहिजे असे सांगितले. तर ना. बा.रणसिंग यांनी आपल्या साहित्यातून उपस्थितांशी संवाद साधत सर्वाची मने  जिंकली. सूत्रसंचालन मंडळाचे सचिव भरत ठाकूर यांनी केले. यांनी केले तर साहित्यिकांची ओळख शिवदास मसके प्रकाश अटक यांनी करून दिली.

You cannot copy content of this page