बांदा/प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पीएमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळा, बांदा नं. १ यांच्या वतीने अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी ‘चिमुकल्या स्वरांतून देशभक्तीचा जयघोष’ या देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक १३ रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बालकांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चिमुकल्या बालकलाकारांना देशभक्तीपर गीतांद्वारे आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या गोड स्वरांतून देशप्रेमाचा संदेश समाजापर्यंत पोहोचणार आहे. तसेच राष्ट्रप्रेम आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
स्पर्धेनंतर सहभागी बालकांना सन्मानपत्र तसेच विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पीएमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळा, बांदा नं. १ येथे होणार आहे. या कार्यक्रमास पालक, ग्रामस्थ व नागरिकांनी उपस्थित राहून चिमुकल्या बालकलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.
चिमुकल्या स्वरांतून देशभक्तीचा जयघोष; बांदा नं. १ शाळेत देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा
