Headlines

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव’ उत्साहात…

जिल्हास्तरीय देशभक्ती कला स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡सावंतवाडी ता.१२-: ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या वतीने जिल्हास्तरीय ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूहगीत, समूह नृत्य व नाट्यछटा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

यापैकी समूह नृत्य स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलने प्रथम, इंग्लिश मीडियम स्कूल, तळवडेने द्वितीय तर न्यू इंग्लिश स्कूल, मातोंडने तृतीय क्रमांक मिळविला. समूहगीत गायन स्पर्धेत ओझर विद्यामंदिर, कांदळगाव यांनी प्रथम, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलने द्वितीय, तर न्यू इंग्लिश स्कूल, मातोंडने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे परीक्षण प्रीती डिसोजा, हवाबी शेख व नंदिता यादव यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र व मेडल्स देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सीईओ ले.कर्नल डॉ.रत्नेश सिन्हा, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई, उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन क्रेसिडा डिसोजा व संपदा राऊळ यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून आणि देशभक्तीपर कलाविष्कारातून साकारलेला हा महोत्सव राष्ट्रप्रेमाची भावना जागविणारा आणि उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.

You cannot copy content of this page