⚡मालवण ता.२३-:
मालवण शहरातील धुरीवाडा येथील सायबा हॉटेल नजिक विजेचा पोल अनेक दिवस धोकादायक स्थितीत असल्याकडे ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी महावितरणचे लक्ष वेधल्यानंतर तात्काळ हा विजेचा पोल बदलण्यात आला आहे. याबद्दल श्री. जोगी यांनी महावितरण अधिकारी, कर्मचारी तसेच या कामी मदत करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. शहरातील अन्य भागात असणारे धोकादायक पोल व वीज वाहिन्या देखील महावितरण ने बदलाव्यात अशी मागणी श्री. जोगी यांनी केली आहे.
ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांच्या मागणीची महावितरणकडून तात्काळ दखल…
