Headlines

पथविक्रेता तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती स्थापन होणार…

कुडाळ न.प. ने मागविले सदस्य नियुक्ती मागणी अर्ज..

⚡कुडाळ ता.२३-: पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम, २०१४ तसेच महाराष्ट्र पथविक्रेता नियम, २०१६ अन्वये कुडाळ नगरपंचायतीकरिता पथविक्रेता तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीवर सदस्य म्हणून नियुक्तीसाठी पात्र व इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
समितीमध्ये अध्यक्ष म्हणून दिवाणी न्यायाधीश किंवा न्यायदंडाधिकारी दर्जाची व्यक्ती तसेच दोन सदस्यांचा समावेश असेल. सदस्यपदासाठी अर्जदाराचे वय ३५ ते ६५ वर्षांदरम्यान असणे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामाचा अनुभव असणे तसेच सामाजिक कार्य, नागरी प्रशासन किंवा पथविक्रेत्यांशी संबंधित विषयांबाबत किमान दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
पात्र व इच्छुक व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज दि. ३० जून २०२६ पूर्वी मुख्याधिकारी, कुडाळ नगरपंचायत यांच्याकडे सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी नगरपंचायत कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page