अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा क्र ४ मध्ये शालेय साहित्य वाटप

राष्ट्रवादी व अर्चना फाऊंडेशनचा उपक्रम

⚡सावंतवाडी ता.२५-: महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे सन्मानीय विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी पक्ष कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चनाताई घारे परब यांनी सावंतवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अर्चना फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून आपल्या कोकणसारख्या दुर्गम भागातील शाळांना विविध सामाजिक व इतर शिक्षण संस्थांच्या माध्यमातून येथल्या शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याचे आणि विद्यार्थ्यांना आधुनिक काळाला सुसंगत शिक्षण सेवा देण्याचे काम पुढील काळात नक्कीच करू असे आश्वासन देत, अर्चनाताई घारे यांनी त्यांच्या या शाळेतील आठवणीना उजाळा देखील दिला, या शाळेचे योगदान त्यांच्या जडणघडणित कशाप्रकारे आहे यांची माहिती देखील त्यांनी दिली. शाळा क्रमांक ४ ही जिल्यातील पहिली ISO शाळा तर आहेच स्वच्छतेसाठी शाळेला महाराष्ट्र राज्यात पहिले मानांकन भेटलं आहे. अर्चनाताई घारे यांचे प्राथमिक शिक्षण देखील याच शाळेत झालेले असल्याने त्यांच्या उच्च शिक्षणाचा पाया इथेच रचला गेला.

यावेळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे,रत्नागिरी लोकसभा पक्ष निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, शहराध्यक्ष रिद्धी परब, जिल्हा युवती अध्यक्ष सावली पाटकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक पावरा सर, केशव जाधव सर आणि इतर शिक्षक-शिक्षिका आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page