Headlines

वक्तृत्व स्पर्धेत रोशन साळुंके व श्रेयस राठोड प्रथम

⚡मालवण ता.१७-: नगर वाचन मंदिर, मालवण आयोजित सौ. विंदा रामकृष्ण जोशी स्मृति वक्तृत्व स्पर्धा ग्रंथालयाच्या सभागृहात संपन्न झाली. या स्पर्धेत तालुकास्तरीय गटात रोशन कैलास साळुंके व जिल्हास्तरीय गटात श्रेयस बंडू राठोड याने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्यवाह नागेश कदम, परिक्षक संग्राम कासले व ॲड. पलाश चव्हाण यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. तालुकास्तरीय…

Read More

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी १५ सप्टेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

⚡मालवण ता.१७-: शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. १५ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि. १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर, २०२२ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याची माहिती जिल्हा समन्वयक संजय शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ६१ व्या हौशी मराठी…

Read More

वायरी येथे १९ रोजी डबलबारी भजन सामना

⚡मालवण ता.१७-: वायरी भूतनाथ येथील श्री जय भूतनाथ युवा प्रतिष्ठानतर्फे गोपाळकाल्यानिमित्त सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. यानिमित्त १९ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वा. तेथील भूतनाथ मंदिर येथे डबलबारीचा सामना आयोजित केला आहे. हा सामना वडचीदेवी भजन मंडळ, लिंगडाळचे बुवा संदीप लोके (पखवाज-योगेश सामंत) व वाडेगती भजन मंडळ, बांदेवाडी, देवगडचे बुवा जयप्रकाश गावकर (पखवाज-रितेश पांचाळ) यांच्यात…

Read More

सफाई कर्मचारी, अंध अपंगासोबत साजरा करणार वाढदिवस

राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.१७-: राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आपल्या वाढदिवसानिमित्त उद्या नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना साखर वाटप करणार असून, तसेच अंध अपंगाच्या भजन मंडळाला आर्थिक मदत करणार आहेत. अशा विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करणार असल्याची माहिती पुंडलिक दळवी यांनी दिली आहे. यावेळी आपल्या निवासस्थानी असणाऱ्या हॉलमध्ये आपला वाढदिवस साजरा…

Read More

राष्ट्रवादीचे नेते शफीक खान आणि जहिरा ख्वाजा यांनी दिल्या डॉ. चितारी यांना शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडीतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ अभिजित चितारी यांच्या नूतन हॉस्पिटलचे दोन दिवसांपूर्वीच उद्घाटन झाले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते शफीक खान, तसेच अल्पसंख्यांक विभागाचे नेते जहिरा आसिफ ख्वाजा, अल्फिया पटेल आदी पदाधिकारी यांनी भेट घेऊन राधा कृष्णची प्रतिमा भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

कामे वाटप करताना किती लोणी खाल्ले हे आम्हाला माहीत आहे

रुपेश राऊळ यांनी गप्प बसावे अन्यथा सर्व उघड करावे लागेल;अनारोजीन लोबो यांचा इशारा सावंतवाडी ता.१७-:मंत्री दीपक केसरकर यांनी विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला होता. परंतु, ही कामे कॉन्ट्रॅक्टरला वाटप करताना कामे देण्यासाठी किती रुपये मागत होते. मिळालेल्या निधीवर किती लोणी खाल्ले हे आम्हला माहित आहे. रुपेश राऊळ यांनी आता गप्प बसावे नाहक टीका करत राहिल्यास…

Read More

चांदा ते बांदा मधील भ्रष्टाचार उघडकीस आणावा

राजन पोकळे यांचे रुपेश राऊळ यांना आवाहन ⚡सावंतवाडी ता.१७-: चांदा ते बांदा या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असेल तर तो त्यांनी उघडकीस आणावा असे प्रतिउत्तर केसरकर समर्थक राजन पोकळे यांनी दिले आहे. यावेळी आपण या समितीचे निमंत्रित सदस्य होतो. त्यामुळे बोलण्या पूर्वी रुपेश राऊळ यांनी समितीचा अभ्यास करावा असा सल्ला रुपेश राऊळ यांना दिला…

Read More

सात गावातील प्राथमिक शाळांना खाऊ वाटप

बाळा परब यांचा स्तुत्य उपक्रम ⚡बांदा ता.१७-: सावंतवाडी तालुक्यातील आरोस, साटेली, कोंडुरे, तळवणे, दांडेली, पाडलोस, न्हावेली गावातील सर्व जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांना जिलेबी स्वरुपात आहार वाटप करून देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळ उपाध्यक्ष बाळा परब यांनी साजरा केला. प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करत चार दिवस…

Read More

आरोंदा-किरणपाणी खाडीत एकाचा बुडून मृत्यू

सावंतवाडी : आरोंदा-किरणपाणी येथील खाडीत एक मृतदेह तरंगताना आढळून आल्याचा प्रकार काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. अवैश चंद्रकांत गावडे (३१, रा.सावरजुवा-आरोंदा) असे त्याचे नाव आहे. याबाबतची खबर त्याचा भाऊ सावळाराम गावडे याने सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सावंतवाडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Read More

एस्टी प्रशासनाचा अनागोंदी कारभार सावंतवाडीत पुन्हा एकदा उघड …

फलाटवर न लागताच एसटी मार्गस्थ; सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण आक्रमक ⚡सावंतवाडी ता.१६-: हात दाखवा आणि एसटी थांबवा असे ब्रीदवाक्य घेऊन ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या एसटी प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा सावंतवाडीत उघड झाला आहे. सात वाजता असलेली आंबोली-गेळे वस्तीची बस सात वाजून दहा मिनिटांनी फलाटवर न लावता मार्गस्थ करण्यात आल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे…

Read More
You cannot copy content of this page