सात गावातील प्राथमिक शाळांना खाऊ वाटप

बाळा परब यांचा स्तुत्य उपक्रम

⚡बांदा ता.१७-: सावंतवाडी तालुक्यातील आरोस, साटेली, कोंडुरे, तळवणे, दांडेली, पाडलोस, न्हावेली गावातील सर्व जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांना जिलेबी स्वरुपात आहार वाटप करून देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळ उपाध्यक्ष बाळा परब यांनी साजरा केला.

प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करत चार दिवस प्रत्येक गावातील शाळांमध्ये अमृतमहोत्सवी दिनानिमित्त मुलांचे वेगवेगळे कार्यक्रम घेऊ सप्ताह साजरा करण्यात आल्याबद्दल बाळा परब यांनी सर्व शिक्षक विद्यार्थी व पालकांचे कौतुक केले.

You cannot copy content of this page