सावंतवाडी : आरोंदा-
किरणपाणी येथील खाडीत एक मृतदेह तरंगताना आढळून आल्याचा प्रकार काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. अवैश चंद्रकांत गावडे (३१, रा.सावरजुवा-आरोंदा) असे त्याचे नाव आहे. याबाबतची खबर त्याचा भाऊ सावळाराम गावडे याने सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सावंतवाडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
आरोंदा-किरणपाणी खाडीत एकाचा बुडून मृत्यू
