एस्टी प्रशासनाचा अनागोंदी कारभार सावंतवाडीत पुन्हा एकदा उघड …

फलाटवर न लागताच एसटी मार्गस्थ; सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण आक्रमक

⚡सावंतवाडी ता.१६-: हात दाखवा आणि एसटी थांबवा असे ब्रीदवाक्य घेऊन ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या एसटी प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा सावंतवाडीत उघड झाला आहे.


सात वाजता असलेली आंबोली-गेळे वस्तीची बस सात वाजून दहा मिनिटांनी फलाटवर न लावता मार्गस्थ करण्यात आल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे याबाबत तक्रारी झाल्यानंतर आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली असून बस स्थानक प्रमुखांना जाब विचारला तसेच याबाबत गंभीर दखल घेऊन संबंधित चालकावर तात्काळ कारवाई करा अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू असा इशारा त्यांनी दिला आहे याबाबत आपण योग्य ती भूमिका घेऊ असे आगाराचे व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी सांगितले तर झालेला प्रकार अयोग्य आहे याबाबत संबंधित चालकाची चौकशी केली जाईल असे कणकवली येथील उपविभागीय नियंत्रण मोहनदास खराडे यांनी सांगितले.
एकीकडे एसटी बस नुकसानीत असताना अशा प्रकारचे घटना खुद्द चालक व वाहनांकडून होत असल्यामुळे या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अशी चव्हाण यांनी मागणी केली आहे

You cannot copy content of this page