माजी सैनिक व विविध स्पर्धामधून पहिल्या तीन क्रमांकामधील मुलांचे होणार सत्कार
सावंतवाडी : सहदेव राऊळ :+ आजादी का अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा उद्या १७ ऑगस्ट रोजी मळगाव येथील खानोलकर मंगल कार्यालय येथे होणार आहे
या सांगत्या सोहळ्यामध्ये माजी सैनिक तसेच सर्व शाळांमधून विविध स्पर्धामधून पहिल्या तीन क्रमांकामध्ये आलेल्या मुलांचे सत्कार होणार आहेत. त्यानंतर बचत गटांचे सांस्कृतिक कार्यक्रम, शाळेच्या मुलांचे समूह गान आदी कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मळगाव सरपंच स्नेहल जामदार यांनी केले आहे.
