आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत मळगाव ग्रामपंचायतचा उपक्रम*
⚡सावंतवाडी ता.१६-: आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत मळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने निरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी रुग्णांना खाऊ वाटप करत त्यांच्या प्रकृतीचीही चौकशी केली. तसेच त्यांनी रुग्णालयात दाखल सर्व रुग्णांचे स्वास्थ्य सुदृड राहण्यासाठी मनोकामना केली. यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब, मळगाव माजी सरपंच निलेश कुडव, निलेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या निकिता राऊळ, अनुजा खडपकर, रत्नमाला तळकटकर स्वरूपा राऊळ आदी उपस्थित होते. निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने मळगाव ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करण्यात आले.
