कामे वाटप करताना किती लोणी खाल्ले हे आम्हाला माहीत आहे

रुपेश राऊळ यांनी गप्प बसावे अन्यथा सर्व उघड करावे लागेल;अनारोजीन लोबो यांचा इशारा

सावंतवाडी ता.१७-:मंत्री दीपक केसरकर यांनी विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला होता. परंतु, ही कामे कॉन्ट्रॅक्टरला वाटप करताना कामे देण्यासाठी किती रुपये मागत होते. मिळालेल्या निधीवर किती लोणी खाल्ले हे आम्हला माहित आहे. रुपेश राऊळ यांनी आता गप्प बसावे नाहक टीका करत राहिल्यास सगळे उघड करू, असा इशारा ज्येष्ठ माजी नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

यावेळी लोबो म्हणाले, केसरकर यांच्यावर टिका करण्याची राऊळ यांची पात्रता नाही. निधी कीती आणला असे विचारणा करणार्‍या राऊळ यांनी आपण आलेल्या निधीतून कीती लोणी खाल्ले, याचे उत्तर द्यावे, कामे मंजूर करण्यासाठी त्यांनी ठेकेदारांकडे मोठ्या प्रमाणात पैसे मागितले. कामातून सुटणार्‍या फायद्यापेक्षा त्यांनी मागितलेली रक्कम जास्त होती. अशा अनेक ठेकेदारांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे जास्त बोेलायला लावू नका, अन्यथा सर्व प्रकार उघड करू, असा इशारा त्यांनी दिला.


त्या पुढे म्हणाले, केसरकर यांनी मोठ्या प्रमाणात आणलेल्या निधीतून राऊळ आज पर्यत वाटचाल करीत आले. परंतू आत्ता आमचे नेते दुसर्‍या पक्षात गेल्यामुळे राऊळ यांचे दुकान बंद झाले आहे. त्यामुळे ते अशा प्रकारे टिका करीत आहेत. आम्ही गप्प राहतो याचा अर्थ वेगळा काढू नये, आम्ही एकत्र काम केले त्यामुळे आज पर्यत टिका केली नाही. परंतू आमच्या नेत्यांवर वारंवार कोण बोलत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. त्याच शब्दात उत्तर दिले जाईल, असे लोबो म्हणाल्या.

You cannot copy content of this page