⚡मालवण ता.१७-: वायरी भूतनाथ येथील श्री जय भूतनाथ युवा प्रतिष्ठानतर्फे गोपाळकाल्यानिमित्त सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. यानिमित्त १९ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वा. तेथील भूतनाथ मंदिर येथे डबलबारीचा सामना आयोजित केला आहे.
हा सामना वडचीदेवी भजन मंडळ, लिंगडाळचे बुवा संदीप लोके (पखवाज-योगेश सामंत) व वाडेगती भजन मंडळ, बांदेवाडी, देवगडचे बुवा जयप्रकाश गावकर (पखवाज-रितेश पांचाळ) यांच्यात होणार आहे. भजन प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे
