⚡मालवण ता.१७-: नगर वाचन मंदिर, मालवण आयोजित सौ. विंदा रामकृष्ण जोशी स्मृति वक्तृत्व स्पर्धा ग्रंथालयाच्या सभागृहात संपन्न झाली. या स्पर्धेत तालुकास्तरीय गटात रोशन कैलास साळुंके व जिल्हास्तरीय गटात श्रेयस बंडू राठोड याने प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्यवाह नागेश कदम, परिक्षक संग्राम कासले व ॲड. पलाश चव्हाण यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. तालुकास्तरीय स्पर्धेत- प्रथम- रोशन कैलास साळुंके, व्दितीय-अस्मि आठलेकर, तृतिय- वेदिका परशुराम लुडबे, उत्तेजनार्थ प्रथम- सेजल गणेश बिरमोळे व उत्तेजनार्थ व्दितीय- संस्कृती मंगेश नाईक यांनी पटकावला. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत- प्रथम- श्रेयस बंडू राठोड, व्दितीय- आयुष अमर म्हापणकर, तृतिय- रिया संतोष कांदळगावकर, उत्तेजनार्थ प्रथम- सिध्दी महादेव देऊलकर व उत्तेजनार्थ व्दितीय- श्रीकांत महादेव घोडके यांनी यश मिळविले.
जिल्हास्तरीय स्पर्धेचे परिक्षण सेवानिवृत्त शिक्षक रविंद्र वराडकर, सेवानिवृत्त शिक्षक विनायक कोळंबकर व अॅड. पलाश चव्हाण यांनी केले. दोन्ही गटातील विजेत्या तीन स्पर्धकांना रोख रक्कमेची पारितोषिके व प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्रेया चव्हाण, प्रतिभा पेडणेकर व रमाकांत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
